आज बऱ्याच दिवसांनी मनात चाललेल्या विचाराला चालना द्यायचं ठरवलंं...गेले कित्येक दिवस मनात होतं स्वतःचा असा ब्लोग सुरु करयचा.खरंतर ही काही अगदी माझी कल्पना नाही.नुकताच माझ्या एका मैत्रिणींने तिचा ब्लॉग तयार केला..तेव्हा सहज माझ्याही मनात आलं आपणही असा केला तर...?
पण तिचा इतकं सहज व्यक्त होणं नाही जमत मला.फार क्वचितच लिहिते मी.मग तिनेच प्रोत्साहन दिलं अन् म्हणाली, "असू दे ग हरकत नाही....तुझ्या कविता टाकत जा..त्यानिमित्ताने लिखाण होईल,विचारांना चालना मिळेल".मग मला वाटलंं खरचं की, काय हरकत आहे असा प्रयत्न करयला.तसही रोजच्या धकाधकीत आपले अनुभव,विचार मांडायला,व्यक्त व्हायला एक छान माध्यम हवचं असतंं.
आज वेळात वेळ काढून नव्या उत्साहाने शुभारंभ करतेय...अपेक्षा आहे तुम्हा सर्वांना नक्की आवडेल.
धन्यवाद
--श्रेया

No comments:
Post a Comment