Saturday, 23 July 2016

का आज असंं होतंय....??

का आज असंं होतयंं,
सारखं मन दाटून येतंय..?
का सारख जुनं आठवतंय,
मन उगीच भूतकाळात रमतंय,
पुन्हा जुन्या आठवणी कुरवाळतंंय..
नक्की काय बरं होत असेल..?
मन कुठं हरवलं असेल..?
थांगच लागत नाही मनाचा,
निशब्द अन् मूकपणे
मीच बोलतेय स्व:ताशी,
शोधतेय स्व:तला,
पाहू दे आता तरी
खरा सूर गवसतोय का..?
हरवलेल्या मनाचा,
पत्ता सापडतोय का..
आणि अचानक,
 शब्द उमटतात कागदावर,
जणू हरवलेला सूर गवसावा,
धुक्याच्या वाटेवर मार्ग दिसावा,
तसं शांत वाटू लागतं,
मनात साचलेलं सारं काही ,
कवितेतून व्यक्त होतं....

--श्रेया 



2 comments: